चीनचा कृतघ्नपणा ! यावरून चीन किती खालच्या स्तराला जाऊ शकतो, हे लक्षात येते ! संपूर्ण जगाने आता चीनवर बहिष्कारच घालायला हवा !
वॉशिंग्टन (अमेरिका) : चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असतांना इटलीने चीनमधील आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी ‘पीपीई ’ किट्स (संच) विनामूल्य दिले होते; मात्र आता इटलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असतांना चीनने तेच किट्स इटलीला विकले आहेत. ‘स्पेक्टॅटर’ या नियतकालिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकार्याने या संदर्भात या नियतकालिकाला माहिती दिली. ‘चीनने इटलीला त्याचेच किट्स विकत घ्यायला भाग पाडले’, असा दावाही या अधिकार्याने केला आहे.
यापूर्वी चीनने स्पेनला कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे किट्स विकले होते; मात्र ते सदोष असल्यामुळे स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरला होता. यानंतर स्पेनने ५० सहस्र सदोष किट्स पुन्हा चीनला पाठवून दिले. नेदरलँड्सला पाठवण्यात आलेले चिनी मास्कही असेच बनावट असल्याचे आढळून आले होते. याविषयी जाब विचारला असता चीनने नेदरलँड्सलाच सुनावले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात