नांदेड : नांदेड आणि नगर येथील मशिदींमध्ये लपलेल्या ४५ तबलीगींविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यांना कह्यात घेतले असून त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे. नांदेड पोलिसांनी ५ एप्रिलला १० इंडोनेशियन नागरिकांविरोधात गुन्हा नोंदवला होता. ते १० जण तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यातील दोघे नांदेडमधील रहिवासी असून ते या इंडोनेशियन नागरिकांसमवेत देहलीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. हे सर्वजण १५ मार्च या दिवशी नांदेडला पोचले आणि तेथील एका मशिदीमध्ये थांबले होते.
नगर पोलिसांनी एकूण ३५ जणांविरोधात गुन्हे नोंदवले असून ते तबलीगी जमातचे कार्यकर्ते आहेत. त्यात २९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. विदेशी नागरिकांनी देहलीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तेही नगरच्या स्थानिक मशिदीत थांबले होते. ४ विदेशी नागरिक आणि १४ स्थानिक लोक त्यांच्या संपर्कात आले असून त्यांना करोनाची लागण झाल्याचे समजते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात