वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेत आतापर्यंत १४ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४ लाख ३५ सहस्र लोकांना त्याची लागण झाली आहे. अमेरिकेतील अनेक भागांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. खाद्यपदार्थांच्या शोधासाठी सहस्रो जण वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लाबंच लांब रांगा दिसत आहेत.
अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यातील एका फूड पॅन्ट्रीमध्ये किमान १०० जणांच्या अन्नाची व्यवस्था केली जाते. एकाच दिवसात अन्नासाठी तेथे अनुमाने ९०० जणांनी रांग लावली होती. असे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. काही ठिकाणी खाद्यपदार्थांचे वाटप करण्यासाठी सुरक्षारक्षकांना बोलवावे लागत आहे. खाद्यपदार्थांचे वाटप करणार्या फूड बँकांना निधीचीही आवश्यकता भासत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात