Menu Close

डोंगरी (मुंबई) येथे गाडी अडवणार्‍या पोलिसाला दुचाकीस्वारांनी फरफटत नेले

मुंबई : डोंगरी येथील ‘पी डिमेलो’ मार्गावर दळणवळण बंदीचा आदेश धुडकावून गाडी चालवणार्‍या युवकांची दुचाकी थांबवणार्‍या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वारांनी फरफटत नेले. यामध्ये दुचाकी थांबवणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक धुरत हे गंभीर घायाळ झाले. ९ एप्रिल या दिवशी दुपारी हा प्रकार घडला. दळणवळण बंदीमुळे येथील ‘ईस्टर्न फ्रीवेवाडी’ येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. येथे दुचाकीवरून येणार्‍या २ युवकांना धुरत यांनी थांबण्यास सांगितले. धुरत यांनी दुचाकीचे ‘हॅण्डल’ पकडले; मात्र दुचाकीस्वार न थांबता त्यांनी गाडी वेगाने पुढे नेली. यामध्ये घायाळ झालेल्या धुरत यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *