भारताच्या विरोधात कट रचणार्या अशा गुंडाला नेपाळमध्ये घुसून अद्दल घडवणे आवश्यक !
नवी देहली : नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी ‘जालिम मुखिया’ याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट रचला आहे. तो नेपाळमधून ४० ते ५० कोरोनाग्रस्तांना भारतात पाठवण्याच्या सिद्धतेत असल्याच्या माहितीनंतर बिहारमधील नेपाळ सीमेवर सुरक्षादलाला सतर्क करण्यात आले आहे. गेल्या २४ मार्चपासूनच ही सीमा बंद करण्यात आली आहे. कुख्यात जालिम मुखिया हा आंतरराष्ट्रीय तस्कर आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी त्याचे थेट संबंध असल्याचे म्हटले जाते. भारतात बनावट नोटा आणि अमली पदार्थ यांच्या तस्करीतही त्याचा हात होता. तो अवैध शस्त्रांच्या तस्करीसाठीही कुख्यात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात