बोईसर
येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला.
डहाणू
नववर्ष स्वागत समिती डहाणूच्या वतीने भव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वागतयात्रेत ३०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी होते. यात विविध चित्ररथ, ढोल-ताशा पथक यांचे विशेष आकर्षण होते. चित्ररथाच्या माध्यमातून गुढीपाडवा साजरा करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.
गोरेगाव
येथे काढलेल्या भव्य फेरीत २०० दुचाकी, ५० रिक्शा, ३ ट्रक आणि १ सहस्रांहून धर्माभिमानी उपस्थित होते.
चुनाभट्टी
पंचशीलनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. या वेळी मंत्रोच्चारांनी गुढीचे विधीवत् पूजन करण्यात आले. येथील स्वातंत्र्यसैनिक श्री. पाटणे यांचा मुलगा श्री. महेश आणि स्नुषा सौ. गौरी यांनी गुढीचे पूजन केले.
चुनाभट्टी आझाद गल्ली येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात आेंकारेश्वर ट्रस्टच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. मंडळाचे श्री. अन् सौ. जीतलाल यांनी गुढीचे पूजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगून हिंदु कालगणनेची माहिती देण्यात आली. या मार्गदर्शनाचा लाभ ४० धर्माभिमान्यांनी घेतला.
कुर्ला
नेहरूनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शर्मिला बांगर यांनी गुढीपाडवा साजरा करण्यामागील धर्मशास्त्र, धर्मावरील आघात आणि धर्मरक्षणाचे उपाय यांविषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी मंदिराचे निवेदक श्री. फोफळे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्याचे कौतुक करून उपस्थितांना समितीच्या धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला २५ हून अधिक धर्मप्र्रेमी उपस्थित होते. या वेळी समितीच्या वतीने धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा कसा साजरा करावा, याविषयीच्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते.
घाटकोपर
नित्यानंदनगर येथील राजकमल मित्रमंडळाची गुढीपाडव्याची वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा झाली. या ठिकाणी मंडळाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. (धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन लावून राष्ट्रकार्यात हातभार लावणार्या राजकलम मित्रमंडळाचा आदर्श सर्वांनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भांडुप
सह्याद्रीनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा आणि हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी हळदी-कुंकू समारंभात उपस्थित महिलांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राधा बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी सौ. बनसोडे यांनी उपस्थित महिलांना गुढीपाडवा हाच नववर्षारंभ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ १०० महिलांनी घेतला.
पवई
येथील गावदेवी मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. याठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी गुढीपाडव्याचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व या विषयी उपस्थित धर्मप्रेमींना माहिती दिली. गुढी उभारल्यानंतर श्री गावदेवी मातेच्या मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. या वेळी २५ धर्माभिमानी उपस्थित होते.
पुणे
येवलेवाडी येथे शास्त्रानुसार गुढी उभारण्याचे प्रात्यक्षिक येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्रानुसार गुढी कशा पद्धतीने उभी करायला हवी, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला. ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे विषय संपूर्ण गावात ऐकू जात होता. प्रात्यक्षिकाची पूर्वसिद्धता गावात चालू असलेल्या धर्मशिक्षण वर्गातील मुलांनी केली.
संभाजीनगर
बालसाधकांच्या फेरीचे आयोजन
गोंदिया विहार येथे बालसाधकांच्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीमध्ये नियमितपणे घेतल्या जाणार्या बालसंस्कार वर्गातील त्यात मुलांनी सहभाग घेतला होता. बालसाधकांनी पारंपरिक पद्धतीचा पोशाख परिधान केला होता. या फेरीत धर्माभिमानी महिला आणि बालसाधक असे ५५ जण सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. फेरी रस्त्याने जात असतांना काही दुकानदारांनी सांगितले, फेरी प्रेरणादायी असून त्या मुलांकडे पाहून चांगले वाटते. मुलांनी दिलेल्या घोषणांमधून संस्कृतीविषयी शिकायला मिळाले.
२. धर्माभिमानी हिंदू श्री. विनोद साळुंके यांनी सर्व बालसाधकांना चॉकलेट दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणानुसार आणि सनातन प्रभातमधील मार्गदर्शनानुसार गुढी उभारण्याचा चुनाभट्टी येथील धर्माभिमान्यांचा आग्रह !
चुनाभट्टी पंचशीलनगर येथे हिंदु जनजागृती समितीचा धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. धर्मशिक्षणवर्गाला येणार्या सर्वांकडून समितीने सांगितलेल्या धर्मशास्त्रानुसार आणि सनातन प्रभातमधील मार्गदर्शनानुसार सामूहिक गुढी उभारण्याचा आग्रह करण्यात आला. त्यानुसार एक दिवस आधी सर्वांनी नियोजनाची बैठक घेतली. सौ. प्रियांका जाधव, सौ. रूपाली पवार, सौ. माळी यांनी गुढीपूजनाचे निमंत्रण देणे, साहित्य आणणे, प्रसाद करणे, निमंत्रण देणे यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात