नवी देहली : कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या प्रभावी ठरलेल्या हायड्रोक्लोरोक्वीनचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे भारताने याची निर्यात थांबवून भारतियांसाठी त्याचा वापर करण्याचे ठरवले होते; मात्र अमेरिका आणि अन्य देशांनी भारताकडे या औषधाची मागणी केल्यानंतर भारताने ही निर्यातबंदी उठवून या देशांना या औषधाचा पुरवठा चालू केला. यावर प्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ब्राझिलचे राष्ट्रपती बोल्सनारो, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे आणि मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलेह यांनीही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. सरकारने हायड्रोक्लोरोक्वीनचे उत्पादन करणार्या आस्थापनांना उत्पादन वाढवण्याचा आदेश दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात