भारतात सर्वाधिक ९५ टक्क्यांची वाढ
आपत्काळात साधना करण्याची आवश्यकता असतांना अशा प्रकारचे कृत्य करणे हे अधोगतीचेच दर्शक होय !
वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात दळणवळण बंदी असतांना घरात रहाणार्यांकडून अश्लील संकेतस्थळे (पॉर्न साईट) पहाण्याच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारतातही काही दिवसांपूर्वी ही वाढ २० टक्के होती; मात्र ती आता ९५ टक्के इतकी झाली आहे. विशेष म्हणजे भारतात ८५७ अश्लील संकेतस्थळांवर बंदी असतांना ही वाढ आश्चर्यकारक मानली जात आहे. ‘पॉर्नहब’ने अश्लील संकेतस्थळाला भेट देणार्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार ‘दळणवळण बंदीनंतर ही संकेतस्थळे पहाणार्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. यात फ्रान्स आणि जर्मनी येथे ४० टक्के, इटलीत ५५ टक्के, रशियामध्ये ५६ टक्के, स्पेनमध्ये ६० टक्के, तर स्वित्झर्लंडमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात