भारताला हे कारखाने देशात आणण्याची सुवर्णसंधी !
नवी देहली : चीनमधून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. याला चीनच उत्तरदायी आहे, असे आता जागतिक मत निर्माण होत आहे, तसेच चीनचे विरोधक असणारे देशही चीनला धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जपानने त्याच्या देशातील आस्थापनांचे चीनमध्ये असलेले कारखाने बंद करून ते जपान किंवा अन्य देशांत स्थलांतरित करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी जपानने ७५ लाख कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. या पार्श्वभूमीवर ही आस्थापने भारतात कशी येतील, हे पहाण्याची सुवर्णसंधी भारताला निर्माण झाली आहे. त्यासाठी भारताने आताच प्रयत्न केले पाहिजेत. अमेरिकेच्या अनेक आस्थापनांचे कारखाने चीनमध्ये आहेत. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच या अमेरिकी आस्थापनांनी तेथून बाहेर पडण्याचा विचार चालू केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात