Menu Close

धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

रांजणगाव पोळ (जिल्हा संभाजीनगर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

संभाजीनगर : गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी ? यामागे हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे आणि हिंदु स्त्रियांना धर्मापासून दूर नेण्याचे हे षड्यंत्र आहे, हेच सिद्ध होते. या संपूर्ण प्रकरणात शासन, प्रशासन किंवा पोलीस यंत्रणा हे आम्हा हिंदूंच्या प्रथा परंपरांचे रक्षण करणार नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. आज आता आई जिजाऊ, अहिल्याबाई होळकर या हिंदूंच्या तेजस्वी स्त्रियांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून समस्त धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी आपल्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले.

धर्मयोद्धा संघटना आणि रांजणगाव पोळ ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेमध्ये त्या बोलत होत्या. (हिंदूंमध्ये धर्मजागृती व्हावी, यासाठी धर्मजागृती सभा आयोजन करणार्‍या धर्मयोद्धा संघटना आणि रांजणगाव पोळ ग्रामस्थ यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या ग्रामस्थांनी रांजणगाव पोळ ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही सभा १० एप्रिल या दिवशी होळी मैदान, रांजणगाव पोळ येथे रात्री ८.३० वाजता झाली.

या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी, धर्मयोद्धा संघटनेचे कैलास कुर्‍हाडे यांनीही उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित केले. धर्मसभेला २५० हून अधिक ग्रामस्थ आणि धर्माभिमानी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धर्माभिमानी सर्वश्री रंगामामा प्रधान, गोटेराम कुर्‍हाडे, आसाराम पाटील, नागेश जोशी आणि कु. प्रियांका लोणे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.

हिंदु राष्ट्र स्थापनेविना हिंदूंसमोर दुसरा पर्याय नाही ! – नागेश जोशी

जगभरामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवणार्‍या ‘इसिस’चा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संभाजीनगरमधील वैजापूर येथे ‘इसिस’चा कमांडर सापडला आहे. त्यांची भारतातील पाळेमुळे शोधून ती नष्ट करायला हवीत. सध्या देशात वाढत असलेला पुरोगाम्यांचा आतंकवाद, गोवंश हत्या, धर्मांतर, मंदिरांचे होत असलेले सरकारीकरण, नक्षलवाद, इस्लामी आतंकवाद या सर्व समस्या सोडवायच्या असतील, तर हिंदूंना धर्मासाठी संघटित व्हावे लागेल आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी प्रयत्न करायला हवे.

हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज बिंबवणे आवश्यक ! – कैलास कुर्‍हाडे हिंदु जनजागृती समिती

मोठ्या प्रमाणात युवकांचे एक हिंदू म्हणून संघटन करते आणि त्याचसाठी या सभेचे आयोजन केले आहे. हिंदु राष्ट्र आणायचे असेल, तर त्यासाठी प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज बिंबवावे लागतील. आज प्रत्येकाने धर्मासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनी जागृत होऊन आपल्यावर होणार्‍या आघातांना तोंड देण्यासाठी सिद्ध व्हायला हवे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *