परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत, तर राज्यघटना अवघ्या ६७ वर्षांपासून कार्यरत आहे. घटनेचे श्रेष्ठत्व वादातीत असून जनतेच्या धार्मिक भावनांशी निगडित परंपरांचे महत्त्वही जपले गेले पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : परंपरा ही घटनेपेक्षाही मोठी आहे का ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने १२ एप्रिल या दिवशी शबरीमला मंदिर न्यायाचे प्रतिनिधित्व करणार्या अधिवक्त्यांना विचारला.
१. मासिक पाळी चालू असलेल्या महिलांना केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवर न्या. पिनाकी चंद्र घोष आणि न्या. एन्.व्ही. रमण यांच्या पिठासमोर सुनावणी चालू आहे.
२. १२ एप्रिलला सुनावणी चालू असतांना न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणात लिंगभेद करणे अस्वीकारार्ह आहे.
३. महिलांना देवतांची पूजा करण्यास मनाई करण्याचा काय अधिकार आहे ? कोणीही देवाची पूजा करू शकतो, तो सर्वव्यापी आहे. (धर्मशास्त्रातील अधिकार धर्माचार्यच जाणतात. त्यामुळे धार्मिकतेमधील अधिकारांविषयी त्यांचेच मत विचारणे सयुक्तिक ठरते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात