कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबिया सरकारने घेतला निर्णय
सौदी अरेबिया हे इस्लामचे प्रमुख केंद्र मानले जाते. तेथेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा धार्मिक कृतींवर बंदी घातली जाते. स्वतःला अधिक शहाणे समजणार्या भारतातील कट्टरतावाद्यांनी सौदी अरेबियाकडून शिकावे !
दुबई – कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत मशिदींमध्ये नमाजपठणावर असलेली बंदी उठवली जाणार नाही. त्यामुळे रमझानच्या काळातील विशेष नमाजपठण (तारावीह) घरीच करावे, असा आदेश सौदी अरेबियाच्या इस्लामिक व्यवहार आणि मार्गदर्शन मंत्रालयाने दिला. भारतातही काही मौलवींनी अशी घोषणा केली आहे.
सौदी अरेबियाचे इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ. अब्दुल लतीफ अल् शेख म्हणाले की, मशिदींमध्ये प्रतिदिन ५ वेळा नमाजपठण करण्यावर घातलेली बंदी ही रमझानच्या काळातील ‘तारावीह’पेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. आम्ही अल्लाला प्रार्थना करतो, ‘नमाजपठण मशिदीत किंवा घरात असो, ते लोकांच्या आरोग्यासाठी आहे, तरी हे विशेष नमाजपठण अल्लाने मान्य करावे. त्याने सर्वांकडून प्रार्थना स्वीकारावी.’