तबलिगी जमातच्या सदस्यांची गुन्हेगारी कृत्ये चालूच : कोरोना रुग्ण असणार्या कक्षामध्ये सशस्त्र पोलीस नियुक्त करण्याची डॉक्टरांची मागणी
जर तबलिगी सातत्याने डॉक्टरांवर आक्रमण करणार असतील आणि त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणार असतील, तर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे नाकारल्यास त्यांना चालणार आहे का ? यापूर्वी कानपूर येथे विकृत कृत्य करणारे तबलिगी नंतर डॉक्टरांकडे प्राण वाचवण्यासाठी उपचार करण्याची याचना करत होते, हे अन्य तबलिगी विसरले का ?
नवी देहली – येथील लोकनारायण जयप्रकाश रुग्णालयात तबलिगी जमातच्या सदस्याकडून महिला डॉक्टरवर अश्लील शेरेबाजी करण्यात आली. त्यास काही डॉक्टरांनी विरोध केला. यावर जमातच्या सदस्यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना धमकावले, तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
१. या रुग्णालयामध्ये तबलिगी जमातच्या२५ वर्षीय सदस्याला कोरोना झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. असे असतांनाही त्याने वॉर्ड क्रमांक ५ए मध्ये उपस्थित असणार्या एका महिला डॉक्टरला पाहून अश्लील शेरेबाजी केली. त्यावर अन्य डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनी त्याला जाब विचारला. हे पाहून तेथे उपस्थित जमातच्या अन्य रुग्णांनी डॉक्टर आणि वार्डबॉय यांना धमकावले. त्यामुळे ते तेथून पळून दुसर्या खोलीमध्ये जाऊन लपले. त्यावर या सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. ‘या वेळी आम्हाला सुरक्षारक्षकांनी साहाय्य केले नाही’, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
२. या घटनेनंतर डॉक्टरांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. याशिवाय ‘संबंधितांवर गुन्हे नोंदवावेत, कोरोनाग्रस्त असणार्या कक्षात सशस्त्र पोलीस ठेवावेत, ज्यांनी संरक्षण करण्यास नकार दिला त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच संबंधित उत्तरदायी अधिकार्यांवर कारवाई करावी’, अशा मागण्या केल्या आहेत.
Delhi: A female doctor was allegedly assaulted by patients at Lok Nayak Hospital,which is treating people with #COVID19. It happened y'day inside surgical ward. When a male doctor came to rescue her,they were manhandled by patients.Doctors had hid inside duty room&called security pic.twitter.com/yMF3mVb3KI
— ANI (@ANI) April 15, 2020
देहली सरकारकडून तबलिगींचा बचाव करण्याचा प्रयत्न
या घटनेविषयी देहलीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, ‘‘हे आक्रमणाचे प्रकरण नाही, तर विनयभंगाचे आहे. (हे केवळ विनयभंगाचे प्रकरण नाही, तर आक्रमणाचा प्रयत्न केल्याचेही प्रकरण आहे. धर्मांधांनी खोलीचा दरवाजा तोडला असता, तर त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली असती; मात्र देहलीतील आम आदमी पक्षाचे सरकार तबलिगींची बाजू घेत त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न करत आहे, हे स्पष्टपणे दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येत आहे. उपचारानंतर आरोपींना पोलिसांच्या कह्यात देण्यात येणार आहे. रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.’’
अशांवर पोलीसच योग्य उपचार करू शकतात ! – भाजप
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन म्हणाले, ‘‘जे स्वतःचे जीवन धोक्यात घालून तबलिगींचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर पोलीसच योग्य ‘उपचार’ करू शकतात.’’