- दळणवळण बंदी असतांना अनधिकृतरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक होतेच कशी ? धर्मांध वारंवार दळणवळण बंदीचे उल्लंघन करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा धाक निर्माण होईल, अशी कारवाई केव्हा होणार ?
- महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही त्याचे सर्रास उल्लंघन चालू असल्याचे अनेक वेळा समोर येते. या कायद्याची कार्यवाही प्रभावीपणे होत नाही, ही वस्तूस्थिती हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि हिंदूंमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे !
- गोप्रेमी वारंवार स्वतःचा जीव धोक्यात घालून गोवंशियांची अवैध वाहतूक रोखतात; मात्र अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना कशी मिळत नाही कि ते हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात, असा प्रश्न गोप्रेमींना पडल्यास चूक ते काय ?
मुंबई : पालघर येथे गोवंशियांच्या मांसाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी गोप्रेमींनी पकडली असून चालक सलमान खान याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सलमान खान याच्यासमवेत असलेल्या अन्य व्यक्तीने घटनास्थळाहून पलायन केले. या प्रकरणात गोरक्षा सेवा समितीचे श्री. नीलेश खोखाणी यांनी सलमान खान, पळून जाणारी अन्य व्यक्ती, तसेच गोवंशियांची कत्तल केल्याच्या प्रकरणी शरिफ काजी, सुभान फौजी यांच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळी पकडण्यात आलेल्या सलमान याला पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले असता त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अन्य व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, १७ एप्रिल या दिवशी सकाळी नालासोपारा येथून गोवंशियांचे मांस विक्रीसाठी बाहेर नेण्यात येणार असल्याची माहिती गोप्रेमींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर त्या मार्गावर तक्रारदार श्री. नीलेश खोखाणी यांच्यासह सर्वश्री कुंदन राऊत, रोहन पाठारे हे सकाळी ६.१० वाजता पोचले. तेथे येणारी ‘टाटा इंडिगो’ कार दिसल्यावर थांबवली असता त्यातील एका व्यक्तीने पलायन केले. या गाडीत मांस होते. गोप्रेमींनी सलमान खान याला गाडीसह पोलिसांच्या कह्यात दिले.