Menu Close

(म्हणे) आखाती देशांमधून हिंदुत्व समर्थकांना हाकलून लावा ! – सौदी अरेबियातील मौलानाची मागणी

काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वी हिंदूंच्याच देशात हिंदूंना हाकलून लावण्यात आले होते, ते पहाता सौदी अरेबियामध्ये असे होणे अशक्य नाही. त्यामुळे भारत सरकारने आताच सौदी अरेबियावर दबाव आणून अशी विधाने करणार्‍या मौलानावर कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे !

मौलाना शेख अबिदी जहरानी

रियाध (सौदी अरेबिया) : मुसलमानांंविरुद्ध द्वेष पसरवणार्‍या आणि गुन्हे करणार्‍या हिंदुत्व समर्थकांना आखाती देशातून हद्दपार केले जावे, अशी मागणी सौदी अरेबियातील मौलाना शेख अबिदी जहरानी यांनी केली आहे; मात्र त्यांनी केलेल्या या आरोपाविषयी कोणतेही विश्‍वसनीय कागदपत्र सादर करण्यात जहरानी अपयशी ठरले आहेत.

१. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या शासनाप्रती निष्ठावंत असलेल्या हिंदूंनी कोरोना विषाणूच्या साठी मुसलमानांना उत्तरदायी ठरवल्यामुळे कोरोनाच्या प्रसारावरून मुसलमानांवरील आक्रमणे वाढली आहेत, असा दावा शेख अबिदी जहरानी यांनी केला आहे. (एक खोटे सतत सांगितल्यास ते खरे वाटू लागते, तसेच हे आहे ! भारतात धर्मांधांकडूनच वैद्यकीय पथक आणि पोलीस यांच्यावरील आक्रमणांत वाढ झाली आहे, हे सत्य असतांना मौलाना खोटे पसरवत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. शेख जहरानी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, मोदी यांच्या समर्थकांनी मुसलमान कोरोना जिहाद करून कोरोना सर्वत्र पसरवण्यासाठी कट करत आहेत, असा खोटा आरोप सर्वत्र पसरवला आहे.

४. शेख अबिदी जहरानी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये कोट्यवधी भारतीय आहेत आणि त्यांच्यापैकी काहींना कोरोनाने ग्रासले असून त्यांचा इस्लामवर विश्‍वास नसतांनाही त्यांच्यावर नि:शुल्क औषधोपचार केला जातो, तर हिंदुत्वनिष्ठ आतंकवादी संघटना मुसलमानांवर अत्याचार करत आहेत. (भारतात तबलिगी जमातचे सदस्य पोलिसांवर, डॉक्टरांवर आक्रमणे करत आहेत, त्यांच्यावर थुंकत आहेत, परिचारिकांशी अश्‍लील वर्तन करत आहेत, तरीही डॉक्टर त्यांच्यावर निःशुल्क उपचार करत आहेत, हे सत्य मौलाना सांगत नाहीत, तर खोटी माहिती पसरवत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *