मुसलमानबहुल इंडोनेशियामध्ये हिंदु विश्वविद्यालय स्थापन होते; मात्र भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे येथे संस्कृत शाळा, संस्कृत विश्वविद्यालय काढणे अथवा शाळांमध्ये गीता शिकवणे याला विरोध होतो, हे लज्जास्पद ! भारतातील निधर्मीवाद्यांना इंडोनेशियातील या विश्वविद्यालयाविषयी काय म्हणायचे आहे ?
बाली (इंडोनेशिया) : रामायणामध्ये भगवान श्रीरामाला माता सीतेचा शोध घेण्यासाठी साहाय्य करणारा वानरराज सुग्रीव याच्या नावाने इंडोनेशियामध्ये पहिले हिंदु विश्वविद्यालय चालू झाले आहे. बाली येथील देनपसार संस्थेचे देशातील पहिल्या हिंदु विश्वविद्यालयात रूपांतर करण्यात आले आहे. या विश्वविद्यालयाला आय गुस्ती बागस सुग्रीवा राज्य हिंदु विविश्वविद्यालय असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा मुसलमान लोकसंख्या असलेला देश आहे.
हिंदु धर्माच्या उच्च शिक्षणाला साहाय्य करणे आणि प्रोत्साहन देणे हे या नव्या विश्वविद्यालयाचे उद्दीष्ट आहे. यात हिंदु उच्च शिक्षण कार्यक्रम, तसेच अन्य उच्च शिक्षण कार्यक्रमांसाठी प्रशासक असतील. संस्थेतील सर्व विद्यमान विद्यार्थी आणि कर्मचारी नव्या विश्वविद्यालयात स्थानांतर झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात