दळणवळण बंदीचे नियम शिथील करण्यावरून जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोनाच्या संकटातील खरा विनाश तर अजून दिसायचाच आहे, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस घेबरेयेसस यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. हे संकट रोखायला हवे. हा एक विषाणू आहे, जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
साभार : द टेलिग्राफ
कोरोनाचा प्रभाव अद्यापही न्यून झाला नसतांना अनेक देश दळणवळण बंदीचे निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ.घेबरेयेसस यांनी ही चेतावणी दिली; मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव आणखी कसा वाढणार ?, याचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. आफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल, असा दावाही जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात