पॅरिस (फ्रान्स) : कोरोना विषाणू हा मानवनिर्मित आहे, असा दावा फ्रान्सचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. ल्यूक मॉन्टेग्निअर यांनी फ्रान्समधील सी न्यूज वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
१. डॉ. ल्यूक म्हणाले की, एड्सच्या प्रसार करणार्या विषाणूवर लस बनवण्याच्या निमित्ताने हा घातक विषाणू बनवण्यात आला. कोरोनामध्ये एच्.आय.व्ही.चे घटक सापडले आहेत, तसेच त्यात मलेरियाचेही काही घटक सापडले आहेत. या विषाणूचा जन्म प्रयोगशाळेत करण्यात झाला आहे. यावरून हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते.
२. चीनच्या शास्त्रज्ञांचे एक पथक वुहानमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेत एड्सवरील लस बनवण्यासाठी कोरोना विषाणूचा वापर करत होते, असे सांगितले जात आहे. ही प्रयोगशाळा अशाप्रकारचे विषाणू बनवण्यात निपूण असून वर्ष २००० पासूनच तेथे संशोधन चालू आहे, असे डॉ. ल्यूक यांचे म्हणणे आहे.
३. यापूर्वी अमेरिकेनेही कोरोना विषाणू चीनमध्ये बनवण्यात आल्याचा आरोप केला होता; मात्र चीनने हा आरोप फेटाळून लावला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात