विविध माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !
मुंबई : कापूरचे उत्पादन आणि विक्री करणार्या रायगड जिल्ह्यातील कुंभीवली येथील मंगलम् ऑरगॅनिक्स लिमिटेड या आस्थापनाने तिच्या मंगलम् कर्पूर या उत्पादनाच्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीराम यांना सेल्फी (भ्रमणभाष संचातील कॅमेर्याद्वारे स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) काढतांना दाखवून प्रभु श्रीरामाचा घोर अवमान केला आहे.
(हे चलचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
या विज्ञापनात प्रभु श्रीरामाच्या वेशातील एक व्यक्ती सेल्फी काढत असतांना तिच्या आईचा तिला दूरभाष येतो आणि ती तिला कापूर आणण्याची आठवण करून देते. त्यानंतर ही व्यक्ती कापूर खरेदी करण्यासाठी दुकानात जातेे. या व्यक्तीची वेशभूषा पाहून दुकानदार तिला तिजोरीमध्ये ठेवलेला मंगलम् कापूर देतो. त्यानंतर ते दोघेही कापूरसह सेल्फी काढतात, असे दाखवण्यात आले आहे. या विज्ञापनामुळे धार्मिक भावना दुखावलेले धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.
संपर्क क्रमांक : (०२२) ४९२०४०८९
ई-मेल : [email protected]
राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !
हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !