Menu Close

चीनकडून भारताला वैद्यकीय सुविधा पुरवण्यावर बंदी घालण्याची अप्रत्यक्ष धमकी

भारताने परदेशी गुंतवणुकीविषयी नियम कठोर करून चीनला रोखल्याचा परिणाम

  • चीन साहाय्याच्या नावाखाली पुरवत असलेले वैद्यकीय साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे त्याच्याकडून ते न घेणेच इष्ट !
  • या धमकीला भीक न घालता भारताने परदेशी गुंतवणुकीच्या नियमांची कठोरपणे कार्यवाही करून चीनला भारतीय आस्थापनांमध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले पाहिजे, तसेच चिनी मालाला भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे बंद करावे ! चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्यावरच तो ताळ्यावर येणार आहे !

बीजिंग (चीन) : एकीकडे कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असतांना दुसरीकडे चीनने अनेक विदेशी आस्थापनांमध्ये गुंतवणूक करून त्या त्याच्या नियंत्रणाखाली आणण्याचा सपाटा लावला आहे. भारतातही त्याने एच्.डी.एफ्.सी. बँकेत गुंतवणूक केल्यावर भारताने विदेशी गुंतवणुकीविषयीचा नियम कठोर करत चीनला रोखण्यासाठी पावले उचलली. त्याला चीनने विरोध दर्शवला होता. आता चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’नेही भारतावर टीका करत भारताला पुरवण्यात येणारे वैद्यकीय साहाय्य रोखण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे.

१. ‘ग्लोबल टाइम्स’ने एका लेखात म्हटले आहे की, चीन स्वतःसह जगभरातील देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यास सक्षम झाला आहे; मात्र भारत सरकारने याकडे दुर्लक्ष करत विदेशी गुंतवणुकीचे नियम कठोर केले आहेत आणि त्यामागे कोरोनाचे संकट असल्याचे सांगितले आहे. भारत वैद्यकीय सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय आस्थापनांना आता अडचणी निर्माण होणार आहेत.

२. या लेखात पुढे म्हटले आहे की, भारताला भीती वाटत आहे की, कोरोनाचा लाभ उठवत चीन भारतीय आस्थापनांना नियंत्रणात घेऊ शकतो आणि काही क्षेत्रांत चीन त्याचे नियंत्रण मिळवू शकतो; मात्र ही भीती पूर्णपणे निराधार आहे.

३. औषधे बनवण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणात कच्चा माल चीनकडूनच खरेदी करतो. भारतीय आस्थापनांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, चीनकडून कच्चा माल मिळत नसल्याने औषधांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *