वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोना विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. या शास्त्रज्ञांनी या संदर्भातील संशोधनाचे निष्कर्ष सार्वजनिक केले नाही. या संशोधनाची समीक्षा केल्यानंतरच हा दावा कितपत सत्य आहे ?, याविषयी ते सांगतील.
१. शास्त्रज्ञांनी सांगितले की, सूर्याची किरणे भूमी आणि हवा या दोन्ही ठिकाणच्या विषाणूंना नष्ट करत असल्याचे लक्षात आले आहे. तापमान आणि आर्द्रता या दोन्ही स्तरांवर आम्ही पाहणी केली असता एकच परिणाम होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तापमान आणि आर्द्रता वाढणे कोरोना विषाणूंसाठी प्रतिकूल आहे.
२. या संशोधनाविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आद्रर्ता आणि सूर्यप्रकाश कोरोना विषाणू नष्ट करत आहेत. डीपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या शास्त्रज्ञांनी एक अहवाल दिला असून त्यामध्ये कोरोना विषाणूचा वेगवेगळे तापमान, हवामान आणि पृष्ठभाग यांवर कसा परिणाम होतो ?, याविषयी माहिती दिली आहे. नव्या संशोधनानुसार हा विषाणू थंड आणि कोरड्या वातावरणात अधिक काळ टिकतो, तर दुसरकीडे उबदार आणि आर्द्रता असलेल्या वातावरण अल्प वेळ टिकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात