जर्मनी, अमेरिका आणि युरोपमधील काही देश चीनकडून हानी भरपाई मागत असल्याने भारतानेही याविषयी विचार केला पाहिजे !
वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोना पसरवणार्या चीनमुळे आमच्या झालेल्या हानीची वसुली आम्ही चीनकडून करणार आहोत; मात्र त्याचा अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. जर्मनीनेही चीनकडून हानी भरपाई मागितली आहे. त्यावरून ट्रम्प यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले की, जर्मनी तिच्या पद्धतीने याकडे पहात आहे. आम्ही आमच्या पद्धतीने विचार करत आहोत. आर्थिक भरपाईचे म्हणाल, तर जर्मनीने जो आकडा सांगितला आहे, त्यापेक्षा मोठ्या रकमेचा आम्ही विचार करत आहोत. कदाचित् यापेक्षा आणखी एखादा सोपा मार्ग आम्ही पत्करू शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात