Menu Close

संभाजीनगर येथे सामूहिक नमाजासाठी एकत्र आलेल्या धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण

पोलीस अधिकार्‍यासह २ कर्मचारी घायाळ

हिंदुत्वनिष्ठ, हिंदु पुजारी आणि भक्त यांच्यावर पोलीस तत्परतेने कारवाई करतात; मात्र नियमांचे उघडपणे उल्लंघन करणारे मौलाना अन् धर्मांध यांच्यावर तत्परतेने कठोर कारवाई करत नाहीत. त्यामुळे हे धर्मांध उद्दामपणे पोलिसांवरच आक्रमण करतात. असे किती दिवस चालू रहाणार ?

संभाजीनगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे, तसेच शहरातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. असे असतांनाही बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील अमिरनगर-प्रकाशनगर येथे काही धर्मांध मशिदीच्या ठिकाणी सामूहिक नमाजपठणासाठी एकत्र आले होते.

याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोचून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र धर्मांधांनी पोलिसांवरच दगडफेक करून आक्रमण केले. या घटनेत एका पोलीस अधिकार्‍यासह २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २७ धर्मांधांना अटक केली आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *