जे जे देशहिताला प्राधान्य देणारे आहे, त्याला विरोध करण्याची कावेबाज मुसलमानांची वाढती मानसिकता देशासाठी धोकादायक !
बरेली (उत्तरप्रदेश) : पतंजलीच्या दंतकांती या टूथपेस्टच्या विज्ञापनामध्ये केलेल्या आवाहनात देशभक्तीपर हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. या विज्ञापनामध्ये कोट्यवधी देशभक्त भारतियांप्रमाणे आपणही पतंजलीच्या उत्पादनांना प्राधान्य द्या. तुमच्या दुकानांत, हृदयात स्थान द्या. त्याद्वारे देशाच्या सेवेत आणि समृद्धीत योगदान द्या. पतंजलीची उत्पादने वापरून स्वदेशीचा आग्रह धरणारे म. गांधी, भगतसिंह आणि रामप्रसाद बिस्मिल यांचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन करण्यात आले आहे. बरेली येथील अधिवक्ता महंमद खालिद जिलानी यांनी या विज्ञापनावर आक्षेप घेऊन त्याविरोधात अॅडव्हर्टायझिंग स्टॅँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एएस्सीआयकडे) तक्रार दाखल केली आहे. (अनेक क्रांतीकारकांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सांगून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे लोकांना आवाहन केले होते. विज्ञापनाद्वारे त्याची लोकांना आठवण करून दिल्यास त्यात चूक ते काय ? देशभक्ती या शब्दावर आक्षेप घेऊन शेवटी भारतियांच्या मनातील देशभक्ती मिटवण्याचा हा मुसलमानांचा कट आहे. हिंदूंनो, हा कट वैध मार्गाने हाणून पाडा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विज्ञापनातील अन्य देशभक्तांप्रमाणे हा शब्द आक्षेपार्ह आहे. पतंजलीची उत्पादने न वापरणार्यांच्या देशभक्तीवर संशय घेण्यासारखे आहे. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी पतंजलीची उत्पादने वापरायला हवीत, असा अर्थ यातून निघतो. तसेच स्वत:ची उत्पादने विकण्यासाठी आस्थापनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा अपवापर केला आहे. (भारतात आरोग्याला घातक असणार्या अनेक उत्पादनांची विज्ञापने प्रसारित होतात. त्याला विरोध करण्याची बुद्धी या महाशयांना कधी झाली का ? या विज्ञापनाला विरोध करण्यामागील अंतस्थ हेतू जनता जाणून आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ते नैतिकतेला धरून नाही, असा युक्तीवाद जिलानी यांनी केला आहे. जिलानी यांची तक्रार एएस्सीआयने दाखल करून घेतली असून विज्ञापनदारांकडून याविषयी स्पष्टीकरण मागवले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात