भारतासह इंग्लंड, अमेरिका येथील जिज्ञासूंनी घेतला लाभ
मुंबई : ‘सिव्हिलायझेशन स्टडिज’ने ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘हलाल सर्टिफिकेट मागील राजकीय अर्थकारण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना निमंत्रित केले होते. २९ एप्रिल या दिवशी दुपारी ३ वाजता श्री. रमेश शिंदे यांनी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले. भारतासह इंग्लंड, अमेरिका येथील काही भारतियांनीही या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ‘सिव्हिलायझेशन स्टडिज’ ही एक वैचारिक चर्चा घडवून आणणारी संघटना आहे. विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ‘सिव्हिलायझेशन स्टडिज’द्वारे आयोजित केले जाते.
या मार्गदर्शनामध्ये श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल सर्टिफिकेट’द्वारे भारतीय अर्थव्यवस्थेवर इस्लामिक राष्ट्रांचा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, त्याचा देशातील अर्थकारणावर होणारा गंभीर परिणाम, याद्वारे भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे षड्यंत्र आदी सूत्रांवर विस्तृत आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात