तिने प्रेम केले, त्याने धोका दिला !
अशा घटनांविषयी तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी किंवा प्रसारमाध्यमे बोलत नाहीत; मात्र हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’चे नाव घेतले की, त्याला लगेच विरोध केला जातो, हे लक्षात घ्या !
हरिद्वार (उत्तराखंड) : येथील कालसी भागात एका हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे, तिचे अपहरण करणे आणि याविषयी वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलिसांनी शाहरूख नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने स्वतःचे नाव अरविंद असे सांगितले होते.
हिंदु मुलीला शाहरूख याची खरी माहिती समजल्यावर तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शाहरूखने तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी त्याच्या समवेत पळून गेली. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी शाहरूख आणि ही तरुणी यांना शोधून काढले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात