तिरुपती : तिरुपती येथील पवित्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात इस्लामिक विश्वविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. या परिषदेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुब्बा रेड्डी आणि उपजिल्हाधिकारी हिमांशु शुक्ला यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु चैतन्य समितीचे श्री ओमकार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन, हिंदु धर्मं रक्षा समन्वय समितीचे श्री. दुर्गा प्रसाद आणि हिंदु सेवा समितीचे श्री. राधा मनोहर दास उपस्थित होते.
परिषदेला संबोधित करतांना श्री चेतन जनार्दन म्हणाले, १७ नोव्हेंबर २०१३ या दिवशी जिल्हाधिकार्यांनी इस्लामिक विश्वविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे बांधकाम करणार्या मदरसा-इ-निसावान इशामत्तूल-इस्लाम उर्दू अॅन्ड अरेबिक डेव्हलपमेंट सोसायटीने उच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केले. तेव्हाही न्यायालयाने यापुढील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले होते; मात्र त्यानंतरही सोसायटीने बांधकाम पूर्ण केले; परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अनधिकृत बांधकाम करणार्या सोसायटीवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. या विरोधात सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल, असेही श्री. जनार्दन यांनी या वेळी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात