Menu Close

(म्हणे) ‘भारतातील हिंसात्मक राजकीय समूह अल्पसंख्यांकांना शिव्या देत आहे !’

गोमातेवरून हिंदूंवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारीची पुन्हा टीका

भारतात काश्मीरमध्ये सहस्रावधी हिंदूंवर अत्याचार कुणी केले ? याविषयी राजकुमारी काही बोलतील का ? देशातील ८ राज्यांत आणि ९० जिल्ह्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक आहेत. तेथील त्यांची स्थिती काय आहे, याचा अभ्यास राजकुमारी करतील का ?

राजकुमारी हेंद अल कासिमी

अबूधाबी (संयुक्त अरब अमिरात) : ‘भारतातील लोक मनुष्यापेक्षा गायीशी चांगला व्यवहार करतात’, असे ट्वीट संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी हेंद अल कासिमी यांनी यापूर्वी केले होते. (भारतातील लोक गायीसह सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करतात; मात्र भारतात आणि जगात असा एक समूह आहे, जो प्राणी सोडाच मनुष्यावरही प्रेम करत नाही. त्यांची निर्घृणपणे हत्या करतो. याविषयी राजकुमारी का बोलत नाहीत ? हिंदु ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ जाणून त्यानुसार आचरण करतात, तर काही जण सर्व जग इस्लाममय करण्याच्या विचाराने कृती करतात, याविषयीही राजकुमारी यांनी बोलले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

त्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, मी कधीही गायीची पूजा करण्यावर टीका केलेली नाही. मी केवळ एक तथ्य मांडण्याचा प्रयत्न केला. गायीला एका देवतेप्रमाणे पुजले जाते आणि हिंदु धर्म शांतीचा धडा शिकवते; मात्र लोकांचा एक नवीन हिंसात्मक राजकीय समूह अल्पसंख्यांकांना शिव्या देत आहे. हे चुकीचे आहे. (तोंड आहे म्हणून बडबडणार्‍या इस्लामी देशाच्या राजकुमारी ! भारतातील ‘राजकीय समूह’ जर हिंसक असते, तर भारतात मुसलमान किंवा ख्रिस्ती औषधाला तरी शिल्लक राहिले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

यापूर्वी तबलिगी जमातविषयी भारतात होत असलेल्या वागणुकीवरून या राजकुमारीने लिहिले होते की, घृणा पसरवणार्‍या गोष्टी हा नरसंहाराचा आरंभ आहे. म. गांधी यांनी एकदा म्हटले होते की, डोळ्यांच्या बदल्यात डोळे घेतल्याने जग आंधळे होईल.

आपल्याला रक्तरंजित इतिहासापासून धडा घेतला पाहिजे. आपल्याला हे समजले पाहिजे की, मृत्यूच्या बदल्यात मृत्यू मिळतो आणि प्रेमामुळे प्रेम निर्माण होते. समृद्धीचा प्रारंभ शांतीपासून होतो. (राजकुमारी हा उपदेश मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांना का देत नाही ? सीरिया, इराण, इराक, येमेन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी देशांना याची सर्वाधिक आवश्यकता आहे, असे त्यांना वाटत नाही का ? कि ते याच्याही पुढे गेलेले आहेत, असे त्यांना वाटते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *