पुणे येथील काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भाविक देवस्थानांमध्ये श्रद्धेने पैसे अर्पण करतात, ते धर्मकार्यासाठी ! हिंदूंच्या देवस्थानांनी कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी सढळ हस्ते पुष्कळ अर्थसाहाय्य केले आहे. अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांनी असे अर्थसाहाय्य केले आहे का ? प्रशासकीय कारभार करतांना एखाद्या विशिष्ट कारणांसाठी प्रस्तावित असलेला निधी अन्यत्र वळवण्यासाठी संबंधित यंत्रणेची अनुमती घ्यावी लागते. हिंदूंच्या देवस्थानांच्या संदर्भात मात्र धर्माचार्यांशी चर्चा न करता लोकप्रतिनिधी मनमानी समादेश देतात. तोही केवळ हिंदूंना देतात ! अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांविषयी अशी मागणी स्वतःला निधर्मी म्हणवणार्या लोकप्रतिनिधींकडून कधी केली जात नाही, हा दुटप्पीपणाच आहे !
पुणे : महसूलप्राप्तीसाठी मद्यविक्रीला अनुमती देण्याऐवजी राज्यातील देवस्थानांचे ८० टक्के पैसे बिनव्याजी वापरावेत, अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. जनतेने सहस्रो कोटी रुपये देवांना दानपेटीत अर्पण केले आहेत. ते तसेच पडून रहाण्यापेक्षा देवस्थानांशी लेखी करार करून बिनव्याजी वापरावेत आणि ते पुन्हा त्यांना परत करावेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात