‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’च्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून जागृतीपर व्याख्यान
मुंबई : हलाल अर्थव्यवस्था ही अल्पसंख्यांकांची हुकूमशाही आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात निर्माण होत असलेल्या धर्माधारित हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’ने ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून श्री. शिंदे यांचे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारतवर्ष’ याविषयी मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. हे मार्गदर्शन३५० हून अधिक जणांनी ‘लाईव्ह’ पाहिले. अनेकांनी ‘कमेंट्स’मध्ये विविध प्रश्न विचारून आपापल्या शंकांचे निरसन करून घेतले.
मार्गदर्शनातील अन्य महत्त्वाची सूत्रे
१. भारतात ‘इस्लामिक बँकिंग’ चालू करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून भारतावर ‘हलाल इकॉनॉमी’ थोपवण्यास प्रारंभ झाला.
२. भारतासारख्या निधर्मी देशात हिंदू संख्येने अधिक असूनही त्यांच्या मागणीचा विचार होतांना दिसत नाही. धर्मनिरपेक्ष भारतात विशिष्ट धर्मावर आधारित अर्थव्यवस्था उभी रहात असतांना हिंदूंनी त्यास विरोध करायला हवा.
३. हलाल अर्थव्यवस्थेने मागील १३ वर्षांतच विश्वभरात दबदबा निर्माण केला आहे. या अर्थव्यवस्थने जवळपास भारताच्या अर्थव्यवस्थेइतका, म्हणजे २.१ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्सचा (१ ट्रिलीयन म्हणजे १ वर १२ शून्य – १००० अब्ज) टप्पाही गाठला आहे. याचे गांभीर्य ओळखून हिंदूंनी स्वत:च्या अधिकारांविषयी जागृत व्हावे.
४. ‘एअर इंडिया’ किंवा ‘मॅक्डोनाल्ड’ येथे हिंदू गेल्यावर ‘आम्हाला हलाल उत्पादन नको, ते आमच्या धर्माला मान्य नाही’, असे ठामपणे सांगत नाहीत. त्यामुळे हिंदूंना नाईलाजास्तव ‘हलाल सर्टिफाईड’ खाद्यपदार्थ खावे लागत आहेत. एका मुसलमान व्यक्तीला ‘झोमॅटो’मध्ये ‘हलाल सर्टिफाईड’ खाद्यपदार्थ न मिळाल्यास तो तक्रार करू शकतो; पण मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’ला विरोध केल्यास हिंदु व्यक्तीवर गुन्हा नोंद होतो, ही कसली धर्मनिरपेक्षता आहे ?
५. देहली येथील रविरंजन सिंह यांनीही आता ‘झटका सर्टिफिकेट’ देण्यास प्रारंभ केला आहे. हिंदु समाजाची अर्थव्यवस्था चालू करण्यासाठी हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे.