Menu Close

भगव्या टोप्यांमुळेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई ! – भाजपचे खासदार अरविंद धर्मापुरी

इंदूर (निझामाबाद, तेलंगाणा) येथील पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचे प्रकरण

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहाणारे खासदार अरविंद धर्मापुरी यांचे आभार ! प्रत्येक धर्मप्रेमी हिंदु लोकप्रतिनिधीने हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे राहिल्यास हिंदुद्वेष्ट्यांना त्यांच्यावर खोटे आरोप करण्यापूर्वी विचार करावा लागेल !

भाजपचे खासदार अरविंद धर्मापुरी

इंदूर (निझामाबाद, तेलंगाणा) : निझामाबादमध्ये भगव्यावर (हिंदूंवर) सूड उगवण्यात येत आहे का ? कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे कारण ठरलेल्या जुन्या शहरामध्ये (ओल्ड सिटीमध्ये) पाऊल ठेवण्यास घाबरणारे पोलीस त्यांनाच फळांचे वाटप करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवत आहेत. यामागील कारण म्हणजे समितीच्या कार्यकर्त्यांनी घातलेली भगवी टोपी हेच आहे. मी सर्वांना निवेदन करत आहे की, घराबाहेर पडतांना भगवी टोपी आणि भगवा मास्क घालू शकत नसू, तर टिळा लावावा, अशा शब्दांत तेलंगाणा येथील भाजपचे खासदार अरविंद धर्मापुरी यांनी ट्वीट करून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे समर्थन केले.

काही दिवसांपूर्वी येथे हिंदु जनजागृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी साहाय्यक पोलीस आयुक्तांशी दूरभाषवरून अनुमती घेऊन दळणवळण बंदीत बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांना फळे आणि सरबत यांचे वाटप केले होते. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्या गाड्या जप्त केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर खासदार अरविंद धर्मापुरी यांनी पोलिसांवर टीका केली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवूनच साहाय्य करत होते !

खासदार धर्मापुरी पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळात बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांना फळे आणि सरबत यांचे वाटप करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या गाड्या जप्त करणारे पोलीस आरोप करत आहेत की, कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर राखले नाही; मात्र प्रत्यक्षात समितीचे कार्यकर्ते मास्क लावून, तसेच सामाजिक अंतर राखून फळे आणि सरबत यांचे वाटत करत होते.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *