वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोनामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेने चीनवर सूड उगवण्याठी पहिले पाऊल टाकत चिनी वस्तूंवर अतिरिक्त कर आकारणार असल्याचे घोषित केले. यामुळे चीनमधून येणार्या वस्तूंचे मूल्य वाढून त्या उत्पादनांना असणारी मागणी घटण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेत याच वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी विदेशांतील उत्पादन निर्मिती करणारे कारखाने मायदेशी आणण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे. त्याचाच भाग म्हणून आता चिनी वस्तूंवरील कर वाढवण्यात आला आहे. चीनने जाणीवपूर्वक कोरोनाचा जगभर प्रसार केला असून त्याविषयीचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा ट्रम्प यांनी यापूर्वीच केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात