कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीन उत्तरदायी आहे, हे जग मान्य करते. इतर वेळी जगाच्या कल्याणाचा ठेका घेण्याच्या थाटात वावरणार्या अमेरिकेने हे सांगण्यासह चीनच्या विरोधात पावले उचलावीत !
वॉशिंग्टन (अमेरिका) : चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला, याचे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. चीनने जाणुनबुजून कोरोनाचा प्रसार केला का ? यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ते ए.बी.सी. वृत्तवाहिनीशी बोलत होते. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही असेच विधान केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्तचर विभागाला कोरोनाचा प्रादुर्भाव नेमका कुठून झाला आहे ?, याचे अन्वेषण करण्याचा यापूर्वीच आदेश दिला आहे.
पॉम्पिओ पुढे म्हणाले की, अमेरिकेतील गुप्तचर विभागाने हा विषाणू मानवनिर्मित किंवा विकसित करण्यात आला नाही, असे म्हटले असले, तरी मी त्याच्याशी सहमत नाही. अनेक तज्ञांनी हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सांगितले आहे. त्याच्यावर विश्वास न ठेवण्यासारखे कोणतेही कारण मला दिसत नाही. गुप्तचर विभागाची माहिती चुकीची आहे. मला वाटते आता संपूर्ण जग सत्य पाहू शकते. चीनने याआधीही जगाला असे अनेक आजार दिल्याचे आणि अल्प दर्जाच्या प्रयोगशाळा चालू केल्याचा इतिहास आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात