कोरोनाच्या संसर्गामुळे देशात दळणवळण बंदी लागू करून आता दीड मास पूर्ण होत आला. कोरोना देशात पसरण्यासाठी अनेक कारणे आहेत. देहली येथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढे तबलिगींकडून प्रत्यार्पण न करणे, शोधमोहीम राबवणार्या पोलिसांनाच मारहाण करणे, आधुनिक वैद्यांच्या अंगावर थुंकणे, त्यांना मारहाण करणे, महिला परिचारिकांपुढे नग्न होऊन फिरणे, उपचारांना सहकार्य न करणे, दळणवळण बंदी घोषित होऊनही मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण करणे, घरांच्या गच्चीवर सामूहिक नमाजपठण करणे आदी समाविघातक कृत्ये चालूच होती, हे सर्वांनीच प्रसिद्धीमाध्यमांद्वारे पाहिले. मशिदींमध्ये अवैधपणे मोठ्या संख्येने विदेशी लपून बसल्याचेही पुढे आले. एवढे प्रसंग घडूनही संबंधितांमध्ये सामाजिक भान जागृत झाले आहे, असे म्हणता येणार नाही. नुकताच रमझान मास चालू झाला आहे. दळणवळण बंदीमुळे मशिदींमध्ये न जाता एखाद्याच्या घरात ५-१०च्या संख्येने एकत्र जमून सामूहिक नमाजपठण केले जात आहे. सातारा शहरातील काही मशिदींमधून सकाळ-संध्याकाळ बांग दिली जात आहे. यामुळे ‘दळणवळण बंदी केवळ हिंदूंसाठीच आहे का ?, ‘रेड झोन’मधून सातारा जिल्ह्याला बाहेर काढण्याचे उत्तरदायित्व केवळ हिंदूंचेच आहे का ?’, असे प्रश्न निर्माण होत आहेत. नगर येथे रमझानच्या काळात मशिदीमधून अजान देण्याला पोलिसांनी अनुमती दिली. त्यामुळे ‘दळणवळण बंदीचे नियम इथे लागू का नाहीत ?’, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दळणवळण बंदी लागू केल्यानंतर समस्त हिंदूंनी गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आदी सण स्वत:च्या घरातच साजरे केले; मात्र आता रमझानचे निमित्त करून घराघरांत ५-१० च्या संख्येने जमणे, मशिदींवरील भोंग्यांवरून बांग देणे, याला काय म्हणायचे ? राज ठाकरे यांनीही ‘हिंदूंचे सण अन् उत्सव घरात आणि रमझानसाठी रस्त्यावर, असे का ?’, हेच सूत्र उपस्थित केले. रमझानचे उपवास झाल्यावर सायंकाळी तो सोडतांना घरात एकत्र येऊन जेवणे, एकमेकांना डबे देणे, अन्नाचे आदानप्रदान करणे आदी गोष्टी केल्या जातात. यामुळे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखले जाते का ? प्रशासनाने लागू केलेल्या कलम १४४ चे पालन होते का ?, याचा आढावा प्रशासनाकडून घेतला जातो का ? त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते कि केवळ समज दिली जाते ?, असे प्रश्न जागरूक नागरिकांच्या मनात आल्यावाचून रहात नाहीत.
धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि नैतिक मूल्ये यांचा बळी देणे उचित नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासन यांच्यावर आधीच ताण आहे; मात्र अशा समाजविघातक वर्तणुकीमुळे कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास ते कुणालाही परवडणारे नाही. ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाच्या सुरक्षेसाठी आपले दायित्व ओळखून कृती करण्याचे सामाजिक भान असायलाच हवे. स्वत:ची मर्यादा उल्लंघून समाजाला बाधक ठरणार्यांना तर कठोर शिक्षाच व्हायला हवी !
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा