Menu Close

दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून देशातील अन्य प्रकल्पांची तपासणी करावी : हिंदु जनजागृती समिती

विशाखापट्टणम् येथील वायू गळतीचे प्रकरण

एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटांशी लढत असतांना ‘भोपाळ वायू दुर्घटने’ची आठवण करून देणारा गंभीर प्रकार विशाखापट्टणम् येथे घडला. येथे 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. वर्ष 1984 मध्ये झालेल्या ‘भोपाळ वायू दुर्घटने’तील दोषींना शिक्षा न झाल्याने त्यात मृत पावलेल्या 20 हजार लोकांना, तसचे जायबंदी झालेल्या 5 लाख लोकांना अद्यापही खरा न्याय मिळालेला नाही. हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून शासनाने विशाखापट्टणम् येथील दोषींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच अशा प्रकारची परिस्थिती देशात अन्य ठिकाणी उद्भवू नये म्हणून घातक-विषारी वायूचा वापर करणार्‍या प्रकल्पांची तातडीने तपासणी करून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती केंद्र आणि राज्य सरकारे यांच्याकडे करत आहे.

वायू गळती होण्याला संबंधित कंपनी जितकी उत्तरदायी आहे, तितकेच तेथे सुरक्षिततेची कठोर अंमलबजावणी न करणारा पर्यावरण विभाग आणि अन्य संबंधित शासकीय यंत्रणाही उत्तरदायी आहेत. त्यामुळे दोषी कंपनीसह शासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे.

पर्यावरणाला घातक असलेला घनकचरा, जैविक कचरा आणि अनधिकृत पशुवधगृहे यांकडे पर्यावरण विभागातील शासकीय यंत्रणा अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे हिंदु जनजागृती समितीने अनेक प्रकरणात अनुभवले आहे. अशा भ्रष्ट आणि कामचुकार शासकीय कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समितीने कधी राष्ट्रीय हरित लवादापुढे जनहित याचिका दाखल करून, तर कधी शासनाकडे तक्रारी करून, तर कधी आंदोलन करून लढा उभारला आहे. समितीच्या या ‘सुराज्य अभियाना’त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समिती या निमित्ताने पुन्हा करत आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *