केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर दळवळण बंदीचे उल्लंघन करून नमाजपठण करण्यात येत आहे. तसेच त्याचे पालन करण्यास सांगणार्या पोलिसांवर आक्रमणे करण्यात येत आहेत. या समूदयाने दळणवळण बंदीचे सक्तीने पालन केले असते, तर महाराष्ट्राचेच नव्हे, देशाचेही चित्र वेगळे असते !
मुंबई : महाराष्ट्रात ३ मेपर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या ५४८ जणांपैकी २३९ जण मुसलमान आहेत. म्हणजेच ही संख्या ४४ टक्के आहे. राज्यात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १२ टक्के आहे. यामुळे राज्य सरकारने हॉटस्पॉट (कोरोनाच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेले भाग) भागामध्ये कोरोनाविषयी उर्दूमध्ये जागरूकता करण्यासाठी मुसलमान धर्मगुरूंचे साहाय्य घेण्याची योजना बनवली जात आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेस या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
१. या वृत्तानुसार राज्यात १७ मार्च ते १५ एप्रिल या काळात १८७ जणांचा मृत्यू झाला, त्यात ८९ जण मुसलमान होते. १५ एप्रिल ते ४ मेपर्यंत ३६१ जणांचा मृत्यू झाला, त्यात १५० मुसलमान आहेत.
२. राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि काही तज्ञ यांच्यामते आखाती देशांतून येणार्या यात्रेकरूंवर उशिरा बंदी घालण्यात आली. तसेच अनेक मशिदींमध्ये २० मार्चपर्यंत नमाजपठण चालूच होते.
३. राज्य महामारी विशेषज्ञ प्रदीप अवाटे यांनी म्हटले की, आखाती देशांत काम करणारे भारतात परतले; मात्र विमानतळांवर त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली नाही. रुग्ण वाढण्यामध्ये धार्मिक कारण नाही, तर वाईट जीवनशैली आहे; कारण प्रादुर्भाव झोपडपट्ट्यांमध्ये वाढत आहे. येथे मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात