वॉशिंग्टन (अमेरिका) : आम्ही आतापर्यंतच्या सर्वांत वाईट परिस्थितीचा सामना करत आहोत. कोरोनाचे आक्रमण आतापर्यंतचे सर्वांत भयानक आक्रमण आहे. पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयानक आहे. आतापर्यंत अमेरिकेवर असे आक्रमण झालेले नाही, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. कोरोनाचे आक्रमण चीनने केले आहे, असा अमेरिकेचा आरोप आहे.
पर्ल हार्बरच्या आक्रमणाचा इतिहास
दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर आक्रमण केले होते. यात अमेरिकेच्या १८ युद्धनौका आणि १८८ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली होती, तसेच २ सहस्र ४०३ अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वांत भयानक आक्रमण मानले जाते. याचा सूड उगवण्यासाठी अमेरिकेने पहिल्यांदा जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणूबॉम्ब टाकले.
९/११ : म्हणजे ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अल् कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटवर विमानांद्वारे आक्रमण केले होते. यात सहस्रो लोकांचा मृत्यू झाला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात