देशाच्या पंतप्रधानांना ‘मौत का सौदागर’ म्हटले की, त्याला ‘व्यक्तीस्वातंत्र्या’चा मुलामा दिला जातो; ओसामा बिन लादेनसारखे अनेक दहशतवादी आणि त्यांच्या दहशतवादी संघटना सातत्याने अन् उघडपणे रक्तरंजित जिहादचा फतवा काढतात, तेव्हा तो धर्माचा अपमान होत नाही ! मात्र धर्माच्या नावे कट्टरतावाद्यांच्या जिहादची केवळ माहिती दिली, म्हणून ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांच्यावर केरळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रसिद्धीमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा तुघलकी प्रकारच आहे. त्याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते. केंद्रशासनाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही हिंदु जनजागृती समिती करत आहे.
देशात ‘हिंदु दहशतवादा’चे लेबल लावून बातम्या केल्या जातात, तेव्हा हिंदु धर्माची मानहानी केली, म्हणून कधीतरी कारवाई झाली आहे का ? त्यामुळे केंद्रशासनाने यात हस्तक्षेप केला पाहिजे. तसेच सर्व राज्य सरकारांसाठी या संदर्भात योग्य सूचना निर्गमित केल्या पाहिजे, अशा मागणीसह भारतातील सर्व प्रसिद्धीमाध्यमे, बुद्धीवादी, राष्ट्रप्रेमी आदींनीही याचा निषेध करावा, असे आवाहनही समितीने केले आहे.