Menu Close

अभिनेते आयुष्मान खुराना यांच्याकडून व्हिडिओतून हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न

‘हिंदूंच्या देवता काही करू शकत नाहीत’, असे म्हणणारे अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? याविषयी हिंदूंनी वैध मार्गाने निषेध नोंदवून देवतांचा अवमान करणार्‍यांना क्षमा मागायला भाग पाडावे !

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पाठवले जाणारे ‘फेक’ (खोटे) संदेश पुढे न पाठवण्याविषयीची जागृती करण्याविषयी अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात ‘कोरोना रोखण्यासाठी भगवंतही काही करू शकत नाही’, असा संवाद घालून हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (भगवंत काय करू शकतो, हे कळण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. हिंदू सहिष्णु असल्यामुळेच त्यांच्या देवतांचा अवमान करणारी अशी वक्तव्ये करण्याचे धाडस हिंदुद्वेष्ट्यांकडून वारंवार केले जाते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

व्हिडिओमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेते आयुष्मान खुराना, अभिनेत्री कृती सनॉन आणि सारा अली खान हे एका वास्तूमध्ये कोरोनाच्या धोक्याविषयी चर्चा करतांना दाखवले आहेत. यामध्ये आयुष्मान खुराना म्हणतात, ‘‘एकदा जर ही महामारी पसरली, तर तिला कुणीही रोखू शकत नाही.’’ त्यावर विराट कोहली म्हणतात, ‘‘भगवंतपण !’’ अशा प्रकारे लोकजागृतीपर ‘व्हिडिओ’मध्ये नकळतपणे ‘ही महामारी रोखणे भगवंतालाही शक्य नाही’, असे दर्शवून हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सामाजिक माध्यमांद्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘फेक’ (खोट्या) संदेशांना प्रतिबंध बसावा, यासाठी विराट कोहली, आयुष्मान खुराना, कृती सनॉन आणि सारा अली खान यांना घेऊन ‘मत करो फॉरवर्ड’ या नावाने एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओप्रमाणे या कलाकारांनी ‘फेक’ संदेशाच्या जागृतीविषयी अन्य एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्यांनी वरीलप्रमाणे हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्मान खुराना यांनी हा व्हिडिओ ‘ट्विटर’ आणि ‘टिकटॉक’ या सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *