मुळातच ज्यांना देवच मान्य नाही, त्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणे, हे हास्यास्पद आणि बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण !
स्वतःचे विचार आणि धोरणे यांचा गोंधळ असलेल्या (अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे नवे आंदोलन !
पुणे : महिलांना मंदिरात प्रवेश देणे, हा त्यांना धर्मश्रद्धेकडे नेण्याचा प्रकार अथवा वैचारिक गोंधळ नसून समता आणि संवैधानिक यांचा लढा आहे. सर्व धर्मातील प्रार्थना स्थळांवर महिलांना प्रवेश मिळायला हवा. त्यासाठी (अंध)श्रद्धा निर्मूलन समिती मंदिर प्रवेशाचा लढा देणार असल्याची माहिती समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी ११ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला उपासनेचा अधिकार असून सर्व धर्मातील महिलांना तो अधिकार मिळावा, अशी समितीची भूमिका आहे. त्यासाठी समितीने मुंबई उच्च न्यायालयात वर्ष २००० मध्ये याचिका प्रविष्ट केली होती.
२. श्री शनिशिंगणापूर येथे महिलांना प्रवेश मिळणे, हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लढ्याचा विजय आहे.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमधील श्री काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठी केलेले आंदोलन आणि साने गुरुजी यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेशासाठी केलेले आंदोलन या आंदोलनाशी जुळणारी भूमिका समितीने घेतली आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांनी केलेले आंदोलन हे अस्पृश्यतेच्या निवारणासाठी केले होते, हेही माहिती नसलेले डॉ. हमीद दाभोलकर अन् (अंध)श्रद्धा निर्मूलन समिती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात