Menu Close

हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधातील #BoycottHalalProducts हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय स्थानी !

हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची ट्विटरवर मागणी

हलाल प्रमाणपत्राचा लोगो

जगातील कट्टर समुदायाकडून प्रत्येक पदार्थ अथवा वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् हलाल असल्याची मागणी होत आहे. यासाठी पदार्थ किंवा वस्तू यांच्या विक्रीसाठी हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी ते केवळ मांसाहारपर्यंतच सीमित होते; मात्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधन, औषधे, चिकित्सालय, घरगुती वस्तू आदींसाठीही ते लागू करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देणारी जमियत-उलेमा-ए-इस्लाम ही संघटना जिहादी आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेल्या ७०० आरोपींचे खटले लढवत आहे. ते लढवण्यासाठी हलाल प्रमाणपत्रातून मिळणार्‍या पैशांचा वापर केला जात आहे, असे समोर आले आहे. हिंदु धर्मप्रेमींना या षड्यंत्राची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून ट्विटरवर #BoycottHalalProducts नावाने  हॅशटॅग चालू केले. याद्वारे होणारा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये प्रथम चौथ्या, तिसर्‍या आणि नंतर दुसर्‍या स्थानावर होता. या ट्रेंडमध्ये १ लाख लोकांनी ट्वीट्स केले.

१. या ट्वीट्समध्ये धर्मप्रेमींनी म्हटले आहे की, हलाल उत्पादने विकून शरीयानुसार पालन करण्यास सांगितले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर म्हणून हलाल अर्थव्यवस्था बनवण्याचे षड्यंत्र आहे.

२. अनेक धर्मप्रेमींनी अशा प्रकारची उत्पादने घेणार नसल्याचे सांगत या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *