पाकिस्तान, बांगलादेश आदी मुसलमानबहुल देशांत अल्पसंख्यांक हिंदूंची ही स्थिती भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना पालटण्याची शक्यता नाही; म्हणून हिंदूंनी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशात कोरोनामुळे असलेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत सर्व भागांतील हिंदूंचा होणारा छळ वाढला आहे.
बांगलादेशात मानवाधिकारांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे; पण दुर्दैवाने बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. बांगलादेश दिवसेंदिवस कट्टरतावादाकडे झुकत आहे. सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना अत्याचाराविरुद्ध योग्य न्याय मिळावा, अशी मागणी वर्ल्ड हिंदु फेडरेशनच्या बांगलादेश चॅप्टरच्या सरचिटणीसांनी केली आहे.
बांगलादेशात एप्रिल २०२० मध्ये हिंदूंवर झालेली आक्रमणे
१. हिंदु मालकांची १२ व्यावसायिक आस्थापने लुटण्यात आली.
२. २ हिंदु उद्योजकांना ठार मारण्यात आले.
३. स्थानिक धर्मांध गुन्हेगारांनी हिंदूंची ३०७ एकर भूमी बलपूर्वक कह्यात घेतली.
४. ३ मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांतील मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
५. २१ हिंदु कुटुंबांना त्यांच्या घरांतून बाहेर काढण्यात आले.
६. २१ हिंदु कुटुंबांना देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले.
७. ४ हिंदु मुलींचे अपहरण केले गेले.
८. ६ हिंदु मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार करण्यात आला.
९. १० हिंदु तरुणींवर बलात्काराचा प्रयत्न झाला.
१०. ३ हिंदु मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात