हिंदी महासागरामध्ये भारताला घेरण्याचा प्रयत्न !
चीनच्या विरोधात भारताने आक्रमक भूमिका घेण्याला पर्याय नाही, हेच ही घटना दर्शवते !
बीजिंग (चीन) : एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढत असतांना दुसरीकडे चीन मालदीव येथे भारतापासून ६८४ कि.मी. अंतरावर एक कृत्रिम बेट निर्माण करत आहे. उपग्रहाद्वारे नुकत्याच घेण्यात आलेल्या छायाचित्रातून हे समोर आले आहे. ओपन सोर्स इंटेलीजेंस एनालिस्ट डेट्रेस्फाकडून ही छायाचित्र सार्वजनिक करण्यात आली आहेत. याद्वारे समुद्रात भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी ते सत्तेवर असतांना वर्ष २०१६ मध्ये त्यांनी त्यांच्या देशाचे १६ बेट चीनला भाडेतत्त्वावर दिले होती. या बेटांजवळच चीन मोठ्या प्रमाणावर बांधकाम करत आहे.
शस्त्रांच्या खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था सिपरीच्या न्यूक्लिअर इंफोर्मेशन प्रोजक्टचे संचालक हेंस क्रिस्टेंसन यांनी ट्वीट करून सांगितले की, मालदीवच्या फेढू फिनोलु बेटाला मालदीवच्या तत्कालीन सरकारने ४ मिलियन डॉलरमध्ये (३० कोटी ३३ लाख रुपयांमध्ये) भाडेतत्त्वावर दिले होते. आता चीन तेथे भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने हिंदी महासागराजवळील अनेक देशांना कर्ज देऊन त्याच्या जाळ्यात अडकवले आहे.
चीनची लढाऊ विमाने २० ते २५ मिनिटांत भारतात येऊ शकणार !
मालदीव हिंदी महासागरातून येणार्या नौकांच्या मार्गावर आहे. या मार्गाद्वारे अब्जावधी रुपयांचा व्यापार केला जातो. त्यामुळे चीनला मालदीव महत्त्वाचे वाटत आहे, तसेच येथून अवघ्या २० ते २५ मिनिटांत चीनची लढाऊ विमाने भारतात येऊ शकणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात