Menu Close

(म्हणे) इस्लामला विरोध करणार्‍यांना आखाती देशांत आल्यावर अटक करून कारागृहात टाका !

आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याचा फतवा

  • कुठे इस्लामला विरोध करणार्‍यांना आखाती देशांत आल्यावर अटक करून कारागृहात टाकण्याची भाषा करणारा डॉ. झाकीर, तर कुठे भारतात हिंदूंच्या विरोधात बोलणार्‍या भारतियालाही अटक करण्याची मागणी न करणारे हिंदू !
  • इस्लामी देशांत इस्लामच्या विरोधात बोलणार्‍यांवर कारवाई होते; मात्र बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदु धर्म आणि त्यांच्या देवतांच्या विरोधात बोलणार्‍यांवर कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या !
  • हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या विरोधात अनेक तक्रारी होऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि त्यांना कतार या आखाती देशात पळून जाऊ दिले आणि तेथेही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, हे लक्षात घ्या !

 

नवी देहली : जर कुणी मुसलमानेतर सामाजिक माध्यमांतून इस्लामच्या विरोधात लिहीत असेल किंवा इस्लामला विरोध करत असेल, तर त्याला इस्लामी देशांत आल्यावर लगेच अटक करून कारागृहात टाका, असा फतवा जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला डॉ. झाकीर नाईक याने काढला. भारतात आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी पसार होऊन मलेशिया येथे रहात असलेल्या डॉ. झाकीर याने एक व्हिडिओ प्रसारित करून हा फतवा काढला आहे.

या व्हिडिओमध्ये डॉ. झाकीर याने केलेली विधाने

१. मी ऐकले आहे की, कुवेत येथील एका अधिवक्त्याने जर आखाती देशांमध्ये कुणी इस्लामचा अवमान करत असेल, तर त्याला समज देण्यात यावी, असे आवाहन केले आहे. यानंतर तो अधिवक्ता संबंधितावर कायदेशीर कारवाई करणार आहे. (भारतात हिंदु धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांवर अशी कारवाई करणारे असे हिंदु धर्मप्रेमी अधिवक्ते सर्वत्र निर्माण झाले, तर हिंदु धर्माकडे कुणीही वक्रदृष्टीने पाहू शकणर नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. हा अधिवक्ता जिनेव्हा येथेही मानवाधिकाराविषयी सूत्रे उपस्थित करतो. मला वाटते की, आखाती देशांमध्ये इस्लामच्या विरोधात बोलणारे फारच अल्प लोक असतील. त्यामुळे मी या अधिवक्त्याला सल्ला देतो की, केवळ इस्लामी देशांतच नव्हे, तर भारतामध्येही जे इस्लामवर प्रश्‍न उपस्थित करतात, त्यांचीही माहिती गोळा केली पाहिजे. भारतात इस्लामवर प्रश्‍न उपस्थित करणारे अधिकतर भाजपशी संबंधित आहेत आणि ते पैसेवाले लोक आहेत.

३. बहुतेक भारतीय नेते त्यांचा पैसा संयुक्त अरब अमिराती आदी आखाती देशांत ठेवतात. या नेत्यांपैकी अर्धे नेते बहुतेक इस्लामी देशांचा किंवा आखाती देशांचा दौरा करतात. (जर ही माहिती खरी असेल, तर भारत सरकारने याची तात्काळ चौकशी केली पाहिजे आणि तो काळा पैसा असेल, तर तो जप्त केला पाहिजे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

४. मी कुवेतच्या अधिवक्त्याला सल्ला देतो की, भारतातील सर्व मुसलमानेतरांची माहिती गोळा करावी. जेव्हा ते पुढच्या वेळी आखाती देशांमध्ये येतील, तेव्हा त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करून कारारगृहात टाकावे. जर असे ५ ते १० जणांच्या संदर्भात करण्यात आले, तर अन्य लोक इस्लामच्या विरोधात बोलण्याचे धाडस करणार नाहीत. यामुळे जरी सर्व जण सुधारले नाही, तरी न्यूनतम २५ टक्के तरी लोक घाबरतील आणि इस्लामवर टीका करण्याचे सोडून देतील. (हिंदूंच्या विरोधात बोलणार्‍यांवरही अशी कारवाई झाली, तर हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे परत कुणाचे धाडस होणार नाही ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *