Menu Close

सांतिनेज (पणजी) येथील कब्रस्तानात मशीद उभारण्याचा डाव महानगरपालिकेच्या सतर्कतेमुळे उधळला

महानगरपालिकेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न फसला

  • दळणवळण बंदीच्या काळात नियमांचे पालन न करता कब्रस्तानात नमाजपठण करणार्‍या धर्मांधांचे हे आणखी एक कारस्थान पहाता ते प्रशासनाला जुमानत नसल्याचेच दिसून येते !
  • असा प्रकार चुकून जर हिंदूंच्या संदर्भात घडला असता, तर एव्हाना पुरोगामी, धर्मांध, नास्तिकतावादी, डावे, काँग्रेसी आदींनी हिंदूंच्या विरोधात देशाचे भगवेकरण होत आहे, अशी आवई उठवली असती. आता हे सर्व लोक सांतिनेज (पणजी) येथील प्रकरणी काहीही बोलणार नाहीत; कारण गैरकृत्य करणारे हिंदू नाहीत !

पणजी : सांतिनेज येथील कब्रस्तानचे सध्या गोवा राज्य नगरविकास प्राधिकरणाकडून (सुडाकडून) सुशोभिकरण चालू आहे. या कब्रस्तानातील जागेत उभारण्यात येत असलेल्या अंतिम प्रार्थनास्थळावर मजला वाढवून मशीद बांधण्याचा डाव आखण्यात आला होता. त्या पद्धतीने सुडाकडून आराखडाही संमत करून घेण्यात आला होता. (चुकीच्या आराखड्याला संमती देणार्‍या संबंधित अधिकार्‍याला सरकारने तात्काळ सेवानिवृत्त करून कारागृहात टाकावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हा सर्व प्रकार पणजी महानगरपालिकेला अंधारात ठेवून चालू होता. महानगरपालिकेने वेळीच लक्ष दिल्याने हा डाव उधळला गेला, अशी माहिती पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

महापौर मडकईकर पुढे म्हणाले, सांतिनेज कब्रस्तानात मृतदेहांचे दफन करण्यापूर्वी अंतिम प्रार्थना म्हटली जाते. त्यासाठी सुशोभित असे प्रार्थनास्थळ बांधले जात आहे; परंतु या प्रार्थनास्थळावर एक मजला वाढवून त्या ठिकाणी आणखी एक प्रार्थनास्थळ (मशीद) बांधण्याचा आराखडा संमत करून घेण्यात आला होता. यामध्ये नमाज पठणापूर्वी हातपाय धुण्यासाठी लागणारी व्यवस्थाही दर्शवण्यात आली होती; मात्र तशी व्यवस्था तळमजल्यावर नव्हती. त्यामुळे पहिल्या मजल्यावर मशीद उभारण्याचा हा प्रयत्न होता, असे लक्षात येते.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *