नवी देहली : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार्या हिंदू विश्व या हिंदी भाषेतील पाक्षिकात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेले २ अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दिनांक १६ ते २९ फेब्रुवारी २०२० च्या अंकात संविधान में ‘सेक्युलरवाद और अल्पसंख्यांकवाद एक साथ नही हो सकते’ या विषयावर, तर १६ ते ३० एप्रिल २०२० च्या अंकात इज्तेमा क्या है ? या विषयावर विस्तृत माहिती देणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
१. दिनांक १६ ते २९ फेब्रुवारी २०२० चा हिंदू विश्वचा अंक हा बहुसंख्यांकांनाही धार्मिक शिक्षणाचा अधिकार मिळावा, या विषयावर काढण्यात आला होता. यात ख्रिश्चन आणि मुस्लिम शिक्षण संस्थांची भूमिका, पाठ्यपुस्तकांचे अधार्मिककरण, विभाजनवादी शिक्षणपद्धती, घटनेतील अनुच्छेद २९ व ३० मध्ये सुधारणा आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याच अंकात श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेला संविधान में सेक्युलरवाद और अल्पसंख्यांकवाद एक साथ नही हो सकते हा लेखही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा लेख सेक्युलवाद अर्थात् धर्मनिरपेक्षतेचा भ्रम दूर करणारा ठरला. यात धर्मनिरपेक्षता हा मूळ राज्यघटनेचा भाग नव्हता, तसेच तो कसा असंवैधानिकरित्या राज्यघटनेत घुसडण्यात आला ?, हे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय एकदा धर्मनिरपेक्षतावाद स्वीकारल्यावर देशाला एखाद्या धर्माच्या आधारावर विशिष्ट समुदायाला अल्पसंख्यांक आणि दुसर्याला बहुसंख्यांक असे संबोधणे चुकीचे आहे. त्यातून हिंदूंसमवेत भेदाभेद आणि अन्याय होत आहे, हे श्री. शिंदे यांनी सोदाहाण पटवून दिले.
२. १६ ते ३० एप्रिलच्या अंकात श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेला इज्तेमा क्या है ? हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखात त्यांनी अनेक ठिकाणी इज्तेमा होतांना तेथे ठिकाणी दंगली होऊन हिंदूंनाच लक्ष्य केले गेले आहे. उजबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि कजाकिस्तान या देशांत इज्तेमावर बंदी आणण्यात आली आहे. इज्तेमाच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. कोरोनाच्या महामारीत शासनाला सहकार्य न करता डॉक्टर आणि परिचारिका यांच्याशी असभ्य वर्तन इज्तेमाला येणारे तबलिगींनी नुकतेच केले. त्यामुळे इज्तेमावर बंदी आणली पाहिजे, असे सांगितले.
पाक्षिक हिंदू विश्वविषयी थोडेसे…
गेल्या ३२ वर्षांपासून प्रकाशित होणारे विश्व हिंदू परिषदेचे हिंदू विश्व हे पाक्षिक संपूर्ण भारतासह विदेशांतही वाचले जाणारे लोकप्रिय नियतकालिक आहे. राष्ट्राचे पुनर्जागरण, हिंदूंचे संघटन आणि हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण, या उद्देशांनी काढण्यात येणार्या २८ पानांच्या पाक्षिकात विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध केले जातात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात