शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीचे प्रकरण
नवी देहली : हिंदु धर्मात महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगळेपण नाही. हिंदू केवळ हिंदू आहेत. हिंदु धर्म जर मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला अनुमती देतो, तर महिलांना कसे रोखता येईल ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. (हिंदूंनी कधीही मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास रोखलेले नाही; मात्र शबरीमला येथील मंदिराच्या संदर्भात तो धर्मशास्त्रामुळे अपवाद आहे. हिंदूंची धर्मशास्त्रावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्याचे पालन केले जात आहे. अन्यथा मंदिरांचे पावित्र्य कसे रोखणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) केरळच्या शबरीमला मंदिरात मासिक पाळी असणार्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा प्रश्न केला.
सुनावणीच्या वेळी शबरीमला व्यवस्थापनाकडून न्यायालयाला सांगण्यात आले की, मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी, तसेच श्री अयप्पा ब्रह्मचारी असल्याने १० ते ५० वयाच्या महिलांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी १८ एप्रिलला ठेवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात