तमिळनाडू विधानसभा निवडणूक
चेन्नई : १९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरमधून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला. जर आपण जागृत झालो नाही, तर आमच्यावर ओढवलेली परिस्थिती तमिळनाडूमध्येही यायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पनून काश्मीरचे श्री. राहुल कौल यांनी येथे केले. शहरातील मयलापूरमध्ये शिवसेना तमिळनाडूच्या वतीने आयोजित निवडणूक प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. शिवसेनेचे राज्य अध्यक्ष श्री. राधाकृष्णन यांनी मयलापूर मतदारसंघातून श्री. विजय कृष्ण यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेतेही सभेमध्ये सहभागी झाले होते. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार सहभागी झाल्या होत्या.
पनून काश्मीरचे श्री. राहुल कौल पुढे म्हणाले, मयलापूरचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु धर्माची सेवा करणारा उमेदवारच निवडून यायला हवा. धर्म आणि संस्कृती यांवर आक्रमण करणार्या शक्तींच्या विरोधात कार्य करणार्या धर्माभिमान्यांना आपण समर्थन द्यायला हवे. धर्म आणि अधर्मात युद्ध चालू असल्याने आपण धर्मरक्षणासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायलाच हवा.
शिवसेना तमिळनाडूचे श्री. राधाकृष्णन् म्हणाले, हिंदूंच्या वेगाने होत असलेल्या धर्मांतरावर नियंत्रण नाही. श्रीलंकेतील तमिळी हिंदूंचे मूळ अधिकार हिरावून घेण्यात आले आहेत. हे सर्व पालटावे लागेल.
सीमेवर सैनिक लढतात, तर देशात हिंदूंसाठी शिवसैनिकांची शिवसेना लढते ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे म्हणाले, भारतात दोन सैन्य आहेत. सीमेवर लढणारे भारतीय सैन्य आणि देशाच्या आत हिंदूंसाठी लढणारी शिवसैनिकांची शिवसेना !
भारतातील भ्रष्ट शहरांत चेन्नई हे दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांत तीन नेते तमिळनाडूतील आहेत. सर्वच निधर्मी पक्ष अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करतात. तसेच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता जेरुसेलमला जाण्यासाठी ख्रिस्त्यांना कोट्यवधी रुपये देतात, हजला जाण्यासाठी मुसलमानांना अनुदान देतात; परंतु हिंदूंना कैलास-मानसरोवर अथवा बद्रीनाथ-केदारनाथ यांसारख्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी काहीच अनुदान दिले जात नाही. त्यामुळे आपण हिंदूंनी धर्मरक्षणासाठी कटिबद्ध रहायला हवे.
शिवसैनिकांनी साधना करावी ! – सौ. सुगंधी जयकुमार, सनातन संस्था
कार्यक्रमाला उपस्थित सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार म्हणाल्या की, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांसह शिवसैनिकांनी साधना करायला हवी. त्याने आपली आंतरिक शक्ती वृद्धींगत हाईल. आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्व ठाऊक हवे. त्याद्वारे आपण हिंदुविरोधी शक्तींचा बौद्धिक स्तरावर बीमोड करू शकू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात