जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : एड्सप्रमाणे कोरोनाही कदाचित कधीच नष्ट होणार नाही. अन्य विषाणूंप्रमाणे कोरोनाही आपल्या समवेत राहू शकतो. त्यामुळे जगाला आता या विषाणूसमवेत जगणे शिकावे लागेल. आपल्याला वस्तूस्थितीचा स्वीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मायकल रेयान यांनी केले.
डॉ. रेयान म्हणाले की, जरी कोरोनाविरोधात लस बनवली गेली, तरी संपूर्ण जगासाठी तिचे उत्पादन करणे कठीणच असणार आहे. या विषाणूविषयीचे प्रत्येक पाऊल आव्हानात्मकच असणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात