प्राचीन काळी जगभरात वैदिक हिंदु संस्कृतीच अस्तित्वात होती, याचे आणखी एक उदाहरण !
लंडन : इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत. हे पाषाणाचे ठोकळे इतके छोटे आहेत की, ते सहजपणे बोटांवर ठेवता येतात.
१. येथील ३८ वर्षीय मासेमार विल यांना ते येथे चुंबकीय पद्धतीद्वारे मासेमारी करत असतांना हे ठोकळे सापडले. सध्या लॉकडाऊनच्या काळात ते चुंबकीय पद्धतीने मासेमारी करत आहेत. प्रथम त्यांना अनेक प्रकारची नाणी मिळाली. नंतर त्यांना हे चौकोनी पाषाण सापडले.
२. याविषयी विल म्हणाले की, यातून मी पूर्वी भारतीय होतो, हे लक्षात येते. या पाषाणांचा उपयोग प्रार्थनेसाठी केला जात होता. प्रार्थनेचे फळ न मिळाल्यास हे पाषाण पाण्यात विसर्जित केले जात होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात